रत्नागिरी - किनारपट्टी भागात साडेचार मिटर उंच लाटांचा थरार आजही पाहायला मिळाला. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी या लाटांचा मिऱ्या बंधाऱ्याला तडाखा बसला आहे. या बंधाऱ्याला आणखी दोन ठिकाणी भगदाड पडले आहे.
रत्नागिरीत मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण - किनारपट्टी
लाटांच्या माऱ्यामुळे या बंधाऱ्याला दोन भगदाड पडले आहे. तसेच आता वस्तीच्या दिशेने लाटांचा मारा होत आहे. हा बंधारा पूर्णपणे फुटून पाणी कधीही मानवी वस्तीत घुसू शकते. त्यामुळे नागरीक भितीच्या छायेत वावरत आहेत.

मिऱ्या बंधारा
बंधाऱ्या बद्दल माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी
विशेष म्हणजे यंदाच कोट्यवधी रुपये खर्च करून आलावा ते पंधरामाड या गावांची समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप थांबवण्यासाठी हा बंधारा बांधण्यात आला. तसेच या बंधाऱ्यावर डांबरी रस्ताही तयार करण्यात आला. मात्र, लाटांच्या माऱ्यामुळे या बंधाऱ्याला दोन भगदाड पडले आहे. तसेच आता वस्तीच्या दिशेने लाटांचा मारा होत आहे. हा बंधारा पूर्णपणे फुटून पाणी कधीही मानवी वस्तीत घुसू शकते. त्यामुळे नागरीक भितीच्या छायेत वावरत आहेत.