रत्नागिरी -भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा होताना पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. काल (सोमवार) पासून चिपळूण, दापोलीला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दापोली बाजापेठ, केळस्कर नाका, तहसील कार्यालयात पाणी साचले होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन हे विस्कळीत झाले आहे.
रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलं; दापोली, चिपळूणला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा -
जुलै महिन्यात आलेल्या महापुराने जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. यामध्ये चिपळूण, खेडला सर्वाधिक फटका बसला होता. त्यातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्रभर चिपळूण, दापोलीला पावसाने अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे रात्री सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पुराचा फटका बसतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. पण सकाळी पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने सध्या पाणी ओसरले असले तरी पावसाची संततधार सुरूच आहे. दुपारी पुन्हा भरती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा - मुखेड तालुक्यात कारसह पितापुत्र गेले वाहून; पाहा व्हिडिओ