महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 7, 2019, 6:15 PM IST

ETV Bharat / state

आंबा घाटातील रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक 20 तासानंतरही बंदच

आंबा घाटातील रत्नागिरी-कोल्हापूर रस्ता खचला आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक अवजड वाहनांसाठी 20 तासांनंतरही बंदच आहे. या मार्गावर छोट्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक मात्र सुरू आहे. आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्त्याला मधोमध भेगा पडल्या आहेत.

आंबा घाटातील रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक 20 तासानंतरही बंदच

रत्नागिरी - आंबा घाटातील रत्नागिरी-कोल्हापूर रस्ता खचला आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक अवजड वाहनांसाठी 20 तासांनंतरही बंदच आहे. या मार्गावर छोट्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक मात्र सुरू आहे. आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्त्याला मधोमध भेगा पडल्या आहेत.

आंबा घाटातील रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक 20 तासानंतरही बंदच

रस्त्याचा हा भाग कधीही दरीत खचू शकतो. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी २४ तास पहारा ठेवला आहे. रस्त्यावरील भेगा वाढल्यामुळे मार्गावरील वाहतूक काल काही काळ बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर काहीच तासांत छोट्या वाहनांसाठी हा घाट सुरु करण्यात आला होता. मात्र, अवजड वहानांसाठी हा घाट बंद करून २० तास लोटले आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी चोविस तास तैनात आहेत. आज सायंकाळनंतर हा घाट सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

दरम्यान, या घाटाच्या दोन्ही बाजूला करोडो रुपये खर्च करून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मात्र निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याने ह्या भिंती कोसळल्या आहेत. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी नाही. त्यामुळे हा रस्ता खचत असल्याचा आरोप प्रशासनावर केला जात आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details