महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

National Flag :राष्ट्रभक्तीसाठी क्रेन मालकाने नाकारले 5 लाखांचे भाडे; शंभर फुटी ध्वजस्तंभासाठी मागवण्यात आली होती अवाढव्य क्रेन

National Flag : देशसेवेसाठी अनेकजण आपापल्या परीने पावलं उचलत असतात. असाच एक प्रसंग रत्नागिरीत समोर आला आहे. या स्तंभाच्या दुरुस्तीसाठी क्रेन आणण्याला सुमारे 5 लाख भाडे लागणार होते, ते नाकारल्याने या क्रेन मालकाचे कौतुक होत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 3, 2022, 1:21 PM IST

रत्नागिरी -रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या 100 फुटी ध्वजस्तंभाची दुरुस्ती शुक्रवारी महाकाय क्रेनच्या साहाय्याने करण्यात आली. यावेळी क्रेन मालकाने यासाठी कोणताही मोबदला न घेता, आपली राष्ट्रभक्ती दाखवून दिली. या स्तंभाच्या दुरुस्तीसाठी क्रेन आणण्याला सुमारे 5 लाख भाडे लागणार होते, ते नाकारल्याने या क्रेन मालकाचे कौतुक होत आहे. दरम्यान आम्ही त्यांना आग्रह केला होता, पण आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचंही योगदान देण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळाली. त्यामुळे राष्ट्रभावनेने आम्ही हे काम केलं असून आम्हाला कोणताही मोबदला नको, असे क्रेन मालकांनी सांगितल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 100 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला होता. हा ध्वज स्तंभ म्हणजे रत्नागिरीकरांसाठी गौरव होता. मात्र, मागील सुमारे 2 वर्षापासून या ध्वज स्तंभावर ध्वज फडकवला न गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. समुद्र जवळ असल्याने या भागात उंचावर वाऱ्याचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्याने या ध्वज स्तंभावरील ध्वज फार काळ टिकत नाही. या ध्वज स्तंभावरील केबल देखील तुटल्याने नवीन ध्वज फडकावण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या कामासाठी अवाढव्य क्रेनची आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने चौकशी करता, अशी क्रेन मुंबई गोवा महामार्गावरून जाणार असल्याचे कळले. या क्रेन मालकाशी संपर्क साधला असता त्याने रत्नागिरीत येण्याची तयारी दाखवली. या क्रेनचे 8 तासांचे भाडे तब्बल 5 लाख रुपये इतके आहे. मात्र सुनील स्टील कॅरिअर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. च्या मालकाने हे भाडे नाकारले तिरंग्याच्या आणि देशाच्या प्रेमापोटी हे भाडे या क्रेनच्या मालकाने नाकारल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शंभर फुटी ध्वजस्तंभासाठी मागवण्यात आली होती अवाढव्य क्रेन

दरम्यान शुक्रवारी ही क्रेन रत्नागिरीत दाखल झाली. या क्रेनच्या सहाय्याने ध्वजस्तंभाच्या टोकाला जाऊन केबल व लाईटची दुरुस्ती करण्यात आली आहे. या कामासाठी जयस्तंभ येथे एकेरी वाहतूक करण्यात आली होती. क्रेनचं काम संपल्यानंतर या स्तंभावरील उर्वरित दुरुस्ती व अन्य किरकोळ कामं सायंकाळपर्यंत करण्यात आली.

हेही वाचा -Nusli wadia murder case : मुकेश अंबानींना वाचवण्याचा सीबीआयचा प्रयत्न, आरोपीचा न्यायालयात दावा

ABOUT THE AUTHOR

...view details