रत्नागिरी -राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आणि संबधितांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी सष्ट केले. ते आज (शनिवारी) रत्नागिरीत बोलत होते.
भाजपचे नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत घेतली होती. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे अन्य नेते यांना रत्नागिरी रिफायरी प्रकल्प हवा आहे, फक्त खासदार विनायक राऊत यांचं प्रबोधन होणे बाकी आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, अजूनही कोणी कोणता रेड, ग्रीन किंवा पिवळा सिग्नल दिला आहे, याची मला माहिती नाही. मात्र, याबाबतीत निर्णय घेण्याचे सर्वाधिक मुख्यमंत्र्यांना आहेत. ते लोकांच्या हिताचा विचार करून याबाबत निर्णय घेतील, असे पालकमंत्री यांनी यावेळी स्पष्ट केले.