रत्नागिरी - पहिल्या मानाच्या गणपतीच्या आगमनाने कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील चौसोपी वाड्यातील पंत जोशी यांच्या गणपतीला पहिला मान मिळतो. जोशी यांना मोरगाव येथे दृष्टांत मिळाल्यापासून या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा सुरू झाली.
कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं थाटात आगमन झाले. 376 वर्षांची परंपरा असणाऱ्या या सार्वजनिक गणपतीचा प्रतिपदा ते चतुर्थी असा चार दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.
हेही वाचा 'लाईट कॅमेरा अॅक्शन'नंतर 'गणपती बाप्पा मोरया'चा आवाजही 'या' स्टुडिओतून होणार लुप्त
पेशवेकाळापासून गणपतीचे आगमन याचप्रकारे होते. दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी, गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. चौघडे, तुतारी, ढोल ताशे या पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघणाऱ्या या गणपतीचा थाट काही वेगळाच असतो. वाजत-गाजत मूर्ती आणल्यानंतर गणपतीची विधीवत पूजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठापणा केली जाते.
हेही वाचा गणपती बाप्पांच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न; पालघर परिसरात रस्त्यांची दुरवस्था
मोरगावच्या उत्सवाप्रमाणे या ठिकाणी गणेशोत्सवाचा हा उत्साह साजरा केला जातो. पावणे चारशे वर्षाहून अधिक काळाची पंरपरा लाभलेला देवरुखच्या चौसोपी वाड्यातील हा गणेशोत्सव कोकणातील परंपरा आणि संस्कृती आजही जपतोय. या गणेशोत्सवाचा आगमनानंतरच कोकणातल्या गणेशोत्सवाला सुरुवात होते.