महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत कोरोनाचा कहर सुरूच; आढळले ४११ नवे रुग्ण, १० जणांच्या मृत्यू - रत्नागिरीत कोरोनाने मृत्यू

रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाडी-वस्तीवर तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात ४ हजार ६५८ तापसण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४११ नवे रुग्ण आढळले आहेत.

Ratnagiri found 411 new covid cases, 10 people died
रत्नागिरीत कोरोनाचा कहर सुरूच

By

Published : Jun 22, 2021, 9:18 AM IST

रत्नागिरी -जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत गेले दोन दिवस पुन्हा वाढ होवू लागली आहे. सोमवारी दिवसभारत ४११ नवे रुग्ण आढळले आहेत. तर सोमवारी ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मागील १ मृत्यू जिल्हा रुग्णालयाने सोमवारी जाहीर केला. त्यामुळे एकूण १० मृत्यूंची नोंद सोमवारी करण्यात आली आहे.

४११ नवे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण-

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाडी-वस्तीवर तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात ४ हजार ६५८ तापसण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४११ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४ जार २४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत ४८ हजार ७३१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मागील चाचण्यातील १०७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


मृत्यूदर दर ३.३८ वर -

दरम्यान सोमवारी दिवसभरात ९ व मागील काही दिवसातील १ जणांचा मृत्यू सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या १६४९ झाली असून, मृत्यूदर दर ३.३८ टक्के झाला आहे.

हेही वाचा - दिलासादायक! राज्यात सोमवारी 6,270 कोरोना रुग्णांची भर; 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details