रत्नागिरी- जिल्ह्यात अँटिजेन चाचणी कमी केल्यानंतर आता कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली, तरी मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी १५ रूग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे, तर गेल्या काही दिवसांतील २१ मृत्यू शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाने जाहिर केले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यूच्या संख्येने १ हजारांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत १०२८ जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी ४५० नव्या रुग्णांची वाढ
शुक्रवारी २८३ नवे रुग्ण आढळले असून मागील १६७ रुग्ण जाहिर करण्यात आल्याने शुक्रवारी ४५० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर २ हजार ८० नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २८३ पॉझिटिव्ह तर १७९७ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत १ लाख ५३ हजार ५८१ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर सद्या ४२५९ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.
शुक्रवारी पॉझिटिव्ह सापडलेल्या २८३ रुग्णांमध्ये रत्नागिरी १६३, गुहागर ७, चिपळूण ३१, संगमेश्वर २४, लांजा ४०, राजापूर १८ रुग्णांचा सामवेश आहे. आतापर्यंत १०२८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूचा दर ३.२० टक्क्यांवर गेला आहे. मृतांमध्ये ४५ ते ६० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी 450 पॉझिटिव्ह रुग्ण, 36 जणांच्या मृत्यूची नोंद - रत्नागिरी कोरोना अहवाल
शुक्रवारी २८३ नवे रुग्ण आढळले असून मागील १६७ रुग्ण जाहिर करण्यात आल्याने शुक्रवारी ४५० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर २ हजार ८० नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २८३ पॉझिटिव्ह तर १७९७ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी