रत्नागिरी- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. दिड महिन्याचा लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतरही मंगळवारी ६५५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मागील ३६८ रुग्णांची घोषणा जिल्हा रुग्णालयाने मंगळवारी केली आहे. त्यामुळे एकूण १०२३ कोरोना रुग्णांची नोंद मंगळवारी झाली आहे. दरम्यान एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७ हजार ४६२ वर पोहचली आहे.
आज ६५५ पॉझिटिव्ह नवे रुग्ण
मंगळवारी जिल्ह्यात विक्रमी तपासणी करण्यात आली आहे. तब्बल ३ हजार ९० स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६५५ पॉझिटिव्ह तर २ हजार ४३५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत १ लाख ७२ हजार १२६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत एकूण ३७ हजार ४६२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३२ हजार २९० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर सद्या ३९२५ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.