रत्नागिरी -रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ( Heavy rain in Ratnagiri district ) या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील 20 गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांतील ही तिसरी घटना आहे.
Raghuveer Ghat: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूचं; रघुवीर घाटात दरड कोसळली - Heavy rain in Ratnagiri district
रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ( Raghuveer Ghat ) या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.
Etv Bharat
गावांना सावध राहण्याची सूचना - हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्मण होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
हेही वाचा -MH cabinet Expansion :अखेर ठरलं! 'या' दिवशी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार