रत्नागिरी- निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिल्याने प्रशासनाचीही लगबग दिसून येत आहे. निवडणूक साहित्य नेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी निवडणूक साहित्य केंद्रावर सकाळपासून हजेरी लावलेली आहे. यासंबंधित निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्याशी बातचित केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १३ लाख १० हजार ५५५ मतदारांची नोंदणी झाली आहे, तर ८४२ सर्व्हिस व्होटर जिल्ह्यात आहेत. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख २७ हजार ७९३ असून स्त्री मतदार ६ लाख ८२ हजार ७५२ एवढ्या आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस दल सज्ज झाले आहे. स्त्री मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात उमेदवारांचा कौल महिला मतदारांच्या हाती असल्याचेच दिसून येत आहे.