रत्नागिरी-रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. ग्रामीण भागात तपासणी वाढविण्यात आल्यानंतर आता रुग्णसंख्या दररोज पाचशेचा टप्पा ओलांडत आहे. सोमवारी दिवसभरात ५९२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात १३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर मागील दोन मृत्यू सोमवारी जाहिर करण्यात आले. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या १५३४ झाली आहे.
सोमवारी नवे ५९२ पॉझिटिव्ह
सोमवारी जिल्ह्यात ३ हजार ७१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५९२ पॉझिटिव्ह तर ३ हजार १२५ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत २ लाख १२ हजार १०७ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याशिवाय ४४ हजार ६५८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सोमवारी ४०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत ३८ हजार ४०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्या ४७१८ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.
मृत्यूची संख्या १५३४ वर
सोमवारी दिवसभरात १३ तर यापुर्वीचे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या १५३४ झाली असून मृत्यूचा दर ३.४३ टक्के झाला आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांचा दर १७.३९ वर पोहचला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ५९२ नवे रुग्ण, तर १५ मृत्यूची नोंद - ratnagiri corona cases
सोमवारी जिल्ह्यात ३ हजार ७१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५९२ पॉझिटिव्ह तर ३ हजार १२५ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत २ लाख १२ हजार १०७ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याशिवाय ४४ हजार ६५८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
रत्नागिरी कोरोनाचे ५९२ नवे रुग्ण