महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 5, 2021, 6:52 AM IST

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात 590 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, तर 16 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 590 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 39 हजार 51 झाली आहे. तर मागील 24 तासात तब्बल 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 590 कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात 590 कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी-जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरी दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 590 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 39 हजार 51 झाली आहे. तर मागील 24 तासात तब्बल 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत बुधवारी 610, गुरुवारी 389 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढून 590 वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1343 पैकी 379 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 985 पैकी 211 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .

16 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात तब्बल 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने झालेल्या मृत्यूपैकी सर्वाधिक 12 रत्नागिरी तालुक्यातील तर चिपळूण 2 आणि संगमेश्वर तालुक्यातील 2 मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 306 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सर्वाधिक 379 मृत्यू रत्नागिरी तालुक्यातील झाले आहेत. चिपळूण तालुक्यातील 256 , खेड 132 , गुहागर 92 , दापोली 115, संगमेश्वर 160, लांजा 68 , राजापूर 92 आणि मंडणगड तालुक्यातील 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.32 % आहे. त्यामुळे रत्नागिरीजिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत नव्याने उच्चांक गाठला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details