महाराष्ट्र

maharashtra

पोल्ट्री फार्मचे निर्जंतुकीकरण करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे व्यावसायिकांना आदेश

जैवसुरक्षा नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे पशुसंवर्धन विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मृत पक्षी आढळल्यास जिल्हा, तालुका स्तरावरील पशुसंवर्धन कार्यालयाला याची माहिती तत्काळ द्यावयाची आहे. कुक्कुटपालकांनी शेडच्या अंतर्गत व बाह्य भागात स्वच्छता मोहीम नव्याने राबवायची आहे.

By

Published : Jan 13, 2021, 3:16 PM IST

Published : Jan 13, 2021, 3:16 PM IST

रत्नागिरी
रत्नागिरी

रत्नागिरी- बर्ड फ्लू विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मचे तत्काळ निर्जंतुकीकरण करावे, असे आदेश जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आले आहेत. पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचा बदके, कावळे आदी जंगली पक्षांशी संपर्क होणार नाही, याची दक्षता व्यावसायिकांनी घ्यावयाची आहे.

रत्नागिरी

जैवसुरक्षा नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे पशुसंवर्धन विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मृत पक्षी आढळल्यास जिल्हा, तालुका स्तरावरील पशुसंवर्धन कार्यालयाला याची माहिती तत्काळ द्यावयाची आहे. कुक्कुटपालकांनी शेडच्या अंतर्गत व बाह्य भागात स्वच्छता मोहीम नव्याने राबवायची आहे. सोडियम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, चुना लावून कुक्कुटपालन शेडचे निर्जंतुकीकरण करावयाचे आहे. चिकन, अंडी १०० अंश सेल्सीयसमध्ये शिजवल्यानंतरच ती सेवन करावीत. चिकन स्वच्छ करताना हँडग्लोज प्राधान्याने वापर करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ०२३५५-२५६१०७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत एका पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details