रत्नागिरी- आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात एकूण 12 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यापैकी 9 जण हे रत्नागिरी शहरातील आहेत, तर धक्कादायक बाब म्हणजे या 9 पैकी 7 जण हे येथील शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे शिक्षक आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ
जिल्ह्यात कोरोना थंडावत आहे, असे वाटत असतानाच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. दरम्यान, आज रत्नागिरीकरांची धागधुग वाढवणारी बाब समोर आली आहे. कारण रत्नागिरी शहरातील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयामधील 7 शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह सापडलेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आहे. याच महाविद्यालयातील सात शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेत. त्यामुळे सध्या या सात शिक्षकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे.
रत्नागिरीतील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे 7 शिक्षक बाधित; आरोग्य यंत्रणा सतर्क - रत्नागिरी 7 शिक्षक पॉझिटिव्ह
कोरोना तपासणी अहवालात एकूण 12 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यापैकी 9 जण हे रत्नागिरी शहरातील आहेत, तर धक्कादायक बाब म्हणजे या 9 पैकी 7 जण हे येथील शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे शिक्षक आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी
औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आज सुट्टीमुळे बंद आहे. मात्र, या महाविद्यालयातील शिक्षक पाॅझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे. या शिक्षकांच्या संपर्कात मुले आली होती का? याची माहिची घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू आहे.