महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरानाची दहशत : पुणे-मुंबईहून आलेल्या नागरिकांनी घरातच थांबावे, अन्यथा कारवाई - कोरोना अपडेट

सद्यस्थितीत संपूर्ण देशात आणि राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यासह बहुतांश भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग होतो. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांपासून व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींपासून दूर राहण्याचा सूचना देण्यात येत आहे. तसेच लोकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.

ratnagiri collector  corona update  corona mahrashtra  corona india  कोरोना अपडेट  रत्नागिरी जिल्हाधिकारी
कोरोना भीती : 8 मार्चनंतर पुणे मुंबईहून आलेल्यांना घरातच राहण्याचे आदेश, आदेशाचा भंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

By

Published : Mar 26, 2020, 12:56 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यामध्ये मुंबई व पुणे शहरातून 08 मार्च 2020 नंतर आलेल्या व्यक्तींना राहत्या घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे.

कोरोना भीती : 8 मार्चनंतर पुणे मुंबईहून आलेल्यांना घरातच राहण्याचे आदेश, आदेशाचा भंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

सद्यस्थितीत संपूर्ण देशात तसेच राज्यात रत्नागिरी जिल्ह्यासह बहुतांश भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग होतो. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांपासून व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींपासून दूर राहण्याचा सूचना देण्यात येत आहे. तसेच लोकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.

मुंबई व पुणे यासारख्या मोठया शहरात कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड-१९) संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यापासून अन्य लोकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई व पुणे शहरातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात जिल्ह्यातील नागरिक येऊ नये म्हणून त्यांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंबंधितचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांनी जारी केले आहेत. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारित आदेश, निर्देश, परिपत्रक या ओदशासह अंमलात राहतील, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details