रत्नागिरी- मनसे पाठोपाठ आता भाजपनेही बांग्लादेशी नागरिकांना लक्ष्य केले आहे. टुरिस्ट व्हिसा घेऊन शहरात वास्तव्यास असलेले बांग्लादेशी नागरिक आक्षेपार्ह गोष्टींचा प्रचार प्रसार करत असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे, हे प्रकरण आणखी गरम होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी: मनसे पाठोपाठ भाजपनेही केले बांग्लादेशींना लक्ष्य; गैरसमज पसरवत असल्याचा दावा - ratnagiri
रत्नागिरीतील राजीवडा परिसरात १३ बांग्लादेशी नागरिक टुरिस्ट व्हिसावर वास्तव्यास आहे. हे नागरिक जमाते तबलीकचे असून ते टुरिस्ट व्हिसाच्या नावाखाली समाजात धार्मिक प्रचार आणि भारत सरकार विरोधात गैरसमज पसरवत असल्याचा दावा शहर भाजप पक्षाकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर, या बांग्लादेशी नागरिकांना असे करता येणार नाही अशी प्रतिक्रिया शहर भाजपकडून व्यक्त करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील राजीवडा परिसरात १३ बांग्लादेशी नागरिक टुरिस्ट व्हिसावर वास्तव्यास आहे. हे नागरिक जमाते तबलीकचे असून ते टुरिस्ट व्हिसाच्या नावाखाली समाजात धार्मिक प्रचार आणि भारत सरकार विरोधात गैरसमज पसरवत असल्याचा दावा शहर भाजप पक्षाकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर, या बांग्लादेशी नागरिकांना असे करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया शहर भाजपकडून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी कारवाईसाठी शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून संबंधित व्यक्तींवर करडी नजर असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
हेही वाचा-वादात रखडला 'गंगातीर्थ'चा विकास, 98 लाखांचा निधीही गेला परत