रत्नागिरी -जिभेची चोचले पुरविण्यासाठी वन्यप्राण्याची शिकार करणे दोघांना भोवले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील झरेवाडी येथे लांडोरला (मोर) एअर गनने मारणाऱ्या हरिश्चंद्र बाबू गोताड (४२) आणि प्रभाकर जानू गोताड (४८),दोन्ही रा.झरेवाडी,रत्नागिरी) या दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे एअर गन, मांसाचे तुकडे, लांडोरचे पिसे व अर्धवट जळालेल्या अवस्थेत अवयव आढळले आहेत.
लांडोर मारण्यात आल्याची वनविभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी आणि रत्नागिरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरिश्चंद्र गोताड आणि प्रभाकर गोताड या दोघांच्या घरी छापा टाकला.
हेही वाचा-बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसी यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक
घरात आढळले लांडोरचे मांस
दोन्ही आरोपींच्या घरी फ्रिजमध्ये लांडोरचे शिल्लक राहिलेले मांस आढळले. तसेच त्यांच्या घरात लांडोरची पिसे, अर्धवट जळलेल्या अवस्थेतील टाकावू अवयव मिळून आल्याने संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडील सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. दोन्ही संशयितांची चौकशी करण्यात आल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.