महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Refinery Project : ...म्हणून राजापूर नगर परिषदेने रिफायनरी समर्थनाचा ठराव केला मंजूर - राजापूर नगर परिषद

रिफायनरी प्रकल्प राजापुरात झाला तर चांगली विकासाची कामे होतील. आरोग्याच्या सुविधा प्राप्त होतील. चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील. रोजगार निर्मिती होईल. याचा विचार करुन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात झाला पाहिजे, या उद्देशाने हा ठराव राजापूर नगर परिषदेत संमत झालेचे सांगण्यात आले आहे.

नगर परिषद
नगर परिषद

By

Published : Jun 22, 2021, 3:42 PM IST

Updated : Jun 22, 2021, 3:59 PM IST

रत्नागिरी -राजापुरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या (Refinery Project) समर्थनार्थ राजापूर नगर परिषदेने मंगळवारी आयोजित सभेत ठराव केला. राजापूर नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला राष्ट्रवादीच्या 1, भाजपाच्या 1 आणि शिवसेनेच्या 2 नगरसेवकांनी समर्थन दिले आहे.

राजापूर नगर परिषदेने रिफायनरी समर्थनाचा ठराव केला मंजूर


११ नगरसेवकांचे ठरावाला समर्थन

रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. राजापूरमध्ये काही ग्रामपंचायतीनी देखील यापूर्वी रिफायनरी समर्थनाचे ठराव केले होते. दरम्यान आता राजापूर नगर परिषदेने देखील रिफायनरी समर्थनाचा ठराव मंजूर केला आहे. नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. या ठरावाला कॉंग्रेसच्या ७, राष्ट्रवादी १, भाजपा १ आणि शिवसेनेच्या २ नगरसेवकांनी ठरावाला समर्थन दिले आहे. अशा एकूण ११ नगरसेवकांनी ठरावाला समर्थन दिले. त्यामुळे ११ विरुद्ध ५ असा हा ठराव मंजूर झाला आहे. रिफायनरी प्रकल्प राजापुरात झाला तर चांगली विकासाची कामे होतील. आरोग्याच्या सुविधा प्राप्त होतील. चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील. रोजगार निर्मिती होईल. याचा विचार करुन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात झाला पाहिजे, या उद्देशाने हा ठराव राजापूर नगर परिषदेत संमत झालेचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -नाणार म्हणू नका, रिफायनरी म्हणा, मुख्यमंत्र्यांची मवाळ भूमिका

Last Updated : Jun 22, 2021, 3:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details