रत्नागिरी - गेले पाच ते सहा दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आज(7 ऑगस्ट) सकाळपासून ओसरला आहे. सखल भागात अजूनही पुराचे पाणी साचलेले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. याचा सर्वाधिक फटका चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, खेड शहरांसह बाजारपेठांना बसला होता. शहारांमध्ये साचलेले पाणी कमी होत असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर - चिपळूण
गेले पाच ते सहा दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आज(7 ऑगस्ट) सकाळपासून ओसरला आहे. सर्वाधिक फटका चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, खेड शहरांसह बाजारपेठांना बसला होता. शहारांमध्ये साचलेले पाणी कमी होत असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
चिपळूण आणि राजापूर शहरांना तीन पुरांच्या पाण्याचा वेढा पडला होता. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. पाऊस ओझरल्यामुळे चिपळूण बाजारपेठेतील पाणी कमी झाले आहे. तर, नाईक कंपनी, राजापूरमधील जवाहर चौक परिसरात अजूनही दीड ते दोन फूट पाणी साचलेले आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 107.67 मिमी पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक 170 मिमी पावसाची नोंद गेल्या 24 तासांत झाली आहे. याव्यतिरिक्त, गेल्या 24 तासांत गुहागरमध्ये 131 मिलिमीटर, दापोलीमध्ये 125 मिमी, संगमेश्वरमध्ये 118 मिमी, खेडमध्ये 103 मिमी, मंडणगडमध्ये 101 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.