महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत विश्रांती नंतर पावसाची पुन्हा हजेरी; बळीराजाच्या चिंतेत वाढ - rice crope damage news ratnagiri

गेल्या आठवड्यात पावसाने शेतकऱ्यांना सळो की पळो करुन सोडलं होतं. अनेक शेतकऱ्यांचं कापलेलं पीक शेतातच कुजलं. कापलेल्या भाताला पुन्हा कोंब आले. तर पावसामुळे उभं पीकही जमिनीला टेकलं. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं.

रत्नागिरीत विश्रांती नंतर पावसाची पुन्हा हजेरी

By

Published : Nov 2, 2019, 5:19 PM IST

रत्नागिरी- पावसामुळे जिल्ह्यातला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर या आठवड्यात रविवार पासून मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे भातकापणीच्या कामांना वेग आला होता. मात्र, आज दुपारी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान होत आहे. आधीच जवळपास पन्नास टक्के पीक वाया गेलं आहे. त्यात आज पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि पुढचे काही दिवस पावसाची अशीच स्थिती राहिली तर उरलं-सुरलं पीकही वाया जातं की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

रत्नागिरीत विश्रांती नंतर पावसाची पुन्हा हजेरी

हेही वाचा-रोजगारासाठी निघाला तरुण, १० दिवसांनी घरी पोहोचला मृतदेह

गेल्या आठवड्यात पावसाने शेतकऱ्यांना सळो की पळो करुन सोडलं होतं. अनेक शेतकऱ्यांचं कापलेलं पीक शेतातच कुजलं. कापलेल्या भाताला पुन्हा कोंब आले. तर पावसामुळे उभं पीकही जमिनीला टेकलं. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. यात 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्यांच झालं होतं. त्यानंतर रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शेतकरी पुन्हा भात कापणीला लागला. गेले पाच दिवस भातकापणीच्या कामाला वेग आला होता. त्यात प्रशासनाकडून पंचनामेही सुरू आहेत. मात्र, शनिवारी दुपारी पावसाने रत्नागिरी तालुक्यात हजेरी लावली. काही ठिकाणी 5 ते 10 मिनिटं पाऊस पडत होता. मात्र, त्यानंतर पुन्हा ऊन पडलं. पावसाची ही स्थिती पुढचे काही दिवस अशीच राहिली तर उरलं-सुरलेलं पीक पुन्हा वाया जाण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details