रत्नागिरी - अनेक ठिकाणी आज तुरळक आणि मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. पुढील पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रत्नागिरीत पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा - राजापूरमध्ये
रत्नागिरी जिल्ह्यात दि. 13 जून ते दि 17 जून या कालावधीत जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दि. 13 जून ते दि 17 जून या कालावधीत जिल्ह्यातील पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच नागरिकांनी या कालावधीत योग्य ती सावधगिरी व सुरक्षितता घेण्याचे जिल्हाप्रशासनाने आवाहन केले आहे.
मान्सून अद्याप कोकणात दाखल झाला नाही. तरीदेखील मान्सूनपूर्व पाऊस रत्नागिरीत अनेक ठिकाणी चांगलाच बरसला आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत 333 मिमी पाऊस झाला असून सरासरी 37 मिमी इतका पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे. गेल्या 24 तासांत मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चांगलीच हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात झाला. मंडणगडमध्ये 58 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. तर त्या खालोखाल दापोलीत 51 मिमी पाऊस पडला आहे. रत्नागिरी आणि राजापूरमध्ये 40 मिमी पेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आहे.