महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मडगाव-हप्पा रेल्वेतून दीड लाखाची दारू जप्त - गुजरात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतुकीव्दारे गुजरातला नेण्यात येत असलेली अवैद्य दारू रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहे.

कारवाईनंतर माहिती देताना रेल्वे पोलीस

By

Published : Mar 23, 2019, 12:34 PM IST

रत्नागिरी- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतुकीव्दारे गुजरातला नेण्यात येत असलेली अवैद्य दारू रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. ही दारू गोवा बनावटीची असून कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव-हप्पा या ट्रेनमधून ही दारु वाहतूक करण्यात येत होती.

कारवाईनंतर माहिती देताना रेल्वे पोलीस

रेल्वे पोलिसांना मडगाव-हप्पा ट्रेनमधून गोवा बनावटीची दारू गुजरातला घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. बोगीच्या बाथरुमच्या बाहेर असणाऱ्या प्लायमध्ये ही दारु कुणालाही संशय येणार नाही, अशा प्रकारे ठेवण्यात आली होती. रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


जप्त केलेली दारू जवळपास दीड लाख रुपये किमतीची आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून अनेक वेळा गोवा बनावटीची दारुची मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी तस्करी केली जाते. आता तर कोकण रेल्वे मार्गाचा वापर दारु तस्करीसाठी केला जात आहे. गुजरातमध्ये दारू बंदी आहे. मात्र, छुप्या पध्दतीने दारूची विक्री केली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details