महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिसाळलेल्या कुत्रीचा 16 जणांना चावा; गुहागरमधील घटना - गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्र, वेळणेश्वर

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावामध्ये एका पिसाळलेल्या कुत्रीने तब्बल 16 जणांचा चावा घेतला आहे. सोळाव्या व्यक्तीचा चावा घेतल्यानंतर त्या व्यक्तीने कुत्रीला पकडून ठेवल्याने हा प्रकार थांबला.

गुहागर तालुक्यात एका पिसाळलेल्या कुत्रीने तब्बल 16 जणांचा चावा घेतला

By

Published : Sep 4, 2019, 9:44 AM IST

Updated : Sep 4, 2019, 9:52 AM IST

रत्नागिरी - गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावामध्ये एका पिसाळलेल्या कुत्रीने तब्बल 16 जणांचा चावा घेतला आहे. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. सोळाव्या व्यक्तीचा चावा घेतल्यानंतर त्या व्यक्तीने कुत्रीला पकडून ठेवल्याने हा प्रकार थांबला. मात्र, या प्रकरणामुळे सर्व गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा दुचाकीला पाडल्याचा जाब विचारल्याने कानाला चावा घेऊन पाडला तुकडा

पिसाळलेल्या कुत्रीने सर्वप्रथम घराच्या आवारात टीव्ही बघत बसलेल्या एका मुलाचा चावा घेतला. यानंतर एका मुलीच्या चेहऱ्याचा लचका तोडला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, उर्वरित सर्वांना हेदवी तसेच गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

हेही वाचा भंडाऱ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा १२ जणांना चावा, ३ जण गंभीर जखमी

कुत्रीने चावा घेतलेल्या सोळाव्या व्यक्तीने धाडस करून तिला पकडून ठेवले. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला. गणेशोत्सवाच्या काळात हा प्रकार घडल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Last Updated : Sep 4, 2019, 9:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details