महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

QR कोडमुळे हापूस खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक टळणार

कोकणच्या हापूसच्या नावावर दुसराच आंबा सर्सासपणे खपवला जातो. त्यामुळे ग्राहकांची अनेकवेळा फसवणूक होते. मात्र, आता QR कोडमुळे ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. तसेच या QR कोडमुळे आंब्यासंदर्भात सर्व माहिती मिळणार आहे.

ratnagiri hapus mango news
ratnagiri hapus mango news

By

Published : Apr 29, 2021, 4:28 PM IST

रत्नागिरी -कोकणच्या अस्सल हापूसची गोडी अगदी सातासमुद्रापार पोहचली आहे. मात्र, बाजारात अनेकवेळा आंबा खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. कोकणच्या हापूसच्या नावावर दुसराच आंबा खपवला जातो. त्यामुळे ग्राहकांची अनेकवेळा फसवणूक होते. आता QR कोडमुळे ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. तसेच या QR कोडमुळे आंब्यासोबतच शेतकऱ्याचीही माहितीही ग्राहकाला मिळणार आहे.

प्रतिक्रिया

हापूसची भेसळ रोखण्यासाठी QR कोड प्रभावी -

यावर्षी कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी एका नव्या तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हापूस फक्त कोकणचाच ही ओळख जपून ठेवली जाणार आहे. हापूस हे नावच मुळात आकर्षित करणारे असल्यामुळे विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर होणारी भेसळ होणे हे खऱ्या हापूस शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान होते. विशेषत: आंब्याच्या सीझनमध्ये इतर प्रदेशातील कोणताही आंबा कोकण हापूस म्हणून सर्रासपणे विकला जातो. त्यामुळे खऱ्या हापूस बागायतदारांची आणि ग्राहकांची खूप मोठी फसवणूक होते.

ग्राहकांची फसवणूक टळणार -

या संकटावर उपाययोजना म्हणून कोकणातील आंबा बागायतदारांनी या वर्षी नवीन तंत्राचा प्रायोगिक तत्त्वाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अत्याधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने QR कोड स्टिकर्सच्या माध्यमातून साखळीची संपूर्ण माहिती हापूस फळाच्या स्टीकरवरून अवघ्या काही क्षणात पुरवली जाते. प्रत्येक चलनी नोट जशी वेगळी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक स्टिकरदेखील वेगळा असतो. भौगोलिक निर्देशांक (जीआय) घेतलेल्या आंबा बागायतदारांना प्रायोगिक तत्त्वावर QR कोड देण्यास सुरवात झाली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. पारदर्शकतेबरोबरच बनावटगिरीला आळा बसल्याचा अनुभव बागायतदारांनी व्यक्त केला आहे. बाजारपेठेत हापूसची कर्नाटक आंब्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी भौगोलिक निर्देशांक (जीआय) प्राप्त बागायतदारांना फळावर लावण्यासाठी QR कोड वितरित करण्यात आले आहेत. यंदा एक लाख लोगो वितरीत केले जाणार आहेत. रत्नागिरीतील काही बागायतदारांनी प्रत्येकी दहा हजार लोगो घेतले होते. 220 ते 350 ग्रॅम वजनाच्या फळावर हा लोगो लावून ते बाजारात पाठवण्यात आले. ग्राहकांकडून या बदलासंदर्भात विचारणाही होऊ लागली असल्याचे बागायतदार सांगतात. दरम्यान, लोगोवरुन ते फळ कोणाच्या बागेतून आले आहे, याची माहितीही मिळते. त्यामुळे खात्रीशीर हापूस आंबे खरेदी करण्याचा आनंद अनेक पटींनी वाढणार आहे.

हेही वाचा - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details