रत्नागिरी- शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवाजीनगर भागातील एका इमारतीच्या आवारात मंगळवारी एक मोठा अजगर आढळून आला. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि प्रसंगावधान दाखवत ग्लोरी ओरचिड सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष अमित बामणे यांनी शहरातील सर्पमित्र वायंगणकर यांच्याशी तत्काळ संपर्क साधला. वायंगणकर यांनी अथक प्रयत्नातून अजगराला पकडले आणि जीवदान दिले.
रत्नागिरीत अजगराला पकडण्यात सर्पमित्राला यश हेही वाचा... नाशिकची माया भारत 'अ' संघात; चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी मिळाली संधी
सर्पमित्र वायंगणकर यांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली. त्यांनी या भल्या मोठ्या अजगराला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यानंतर त्यांनी अजगराला पकडले. हल्ली जंगली प्राण्यांचा शहरात वावर वाढला असून मानवाचे निसर्गावरील अतिक्रमण हे यामागे मुख्य कारण असल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. शहरात कोठे जंगली प्राणी आढळून आल्यास घाबरून न जाता तत्काळ प्राणीमित्रांशी संपर्क साधावा, असे आव्हान सर्पमित्र वायंगणकर यांनी केले आहे.
हेही वाचा... नाराज विनायक मेटेंनी भाजपकडे केली 'या' पदाची मागणी