रत्नागिरी -राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज मंडणगड तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे येथे भेट देणार ( President Kovind Visited Amdave ) आहेत. या भेटीत ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर गावातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिराला भेट देतील. त्याठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे.
मोठा पोलीस फौजफाटा
राष्ट्रपती मंडणगडमध्ये येत असल्याने मोठा पोलीस फौजफाटा तालुक्यात तैनात केला आहे. राष्ट्रपती दौऱ्याच्या निमित्ताने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाने मोठी तयारी केली आहे. बंदोबस्तासाठी 118 पोलीस अधिकारी, 800 पोलीस अंमलदार, 200 होमगार्ड असा 1 हजार 118 जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच जलद कृतीदल, दंगाकाबू पथके, एसआरपीएफ तुकड्या, बॉम्बशोधक पथके हे देखील दिमतीला आहेत.