रत्नागिरी - केरळात मान्सूनचे आगमन झाले असून मान्सून लवकरच महाराष्ट्रातही दाखल होईल. मात्र, त्याअगोदर कोकणात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गनंतर आज रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; बळीराजा सुखावला - Sindhudurga
शनिवारी रात्री चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ विजांच्या कडकडाट आणि मेघ गर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.

चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
शनिवारी रात्री चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ विजांच्या कडकडाट आणि मेघ गर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.
पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे बळीराजा चातकाप्रमाणे पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसला आहे. अशातच, आज पावसाने चिपळूणमध्ये हजेरी लावली. तर शुक्रवारीही लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात काही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. तर बळीराजाही थोडासा सुखावला आहे.
Last Updated : Jun 9, 2019, 2:34 PM IST