रत्नागिरी -अनेक वैशिष्ट्यांमुळे कोकणातल्या गणेशोत्सवाचं वेगळेपण टिकून आहे. येथील गणेशमूर्ती कारखान्यांचीही काही वैशिष्ट्ये आहेत. काही गणेश चित्र शाळांमध्ये अगदी पिढ्यांपिढ्या गणेशमूर्ती साकारल्या जातात. संगमेश्वरमधील प्रसादे कुटुंबीयांची 'गणेश चित्र शाळा' ही 100 वर्षे जुनी आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून येथे फक्त पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासूनच मूर्ती तयार केल्या जातात.
गेल्या पाच पिढ्यांपासून 'हे' कुटुंब साकारतंय पर्यावरणपूरक देखण्या गणेशमूर्ती - 100 वर्ष जुनी ही चित्रशाळा
काही गणेश चित्र शाळांमध्ये अगदी पिढ्यांपिढ्या गणेशमूर्ती साकारल्या जातात. संगमेश्वरमधील प्रसादे कुटुंबीयांची ही 'गणेश चित्र शाळा' 100 वर्ष जुनी चित्रशाळा आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून इथे फक्त पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासूनच मूर्ती तयार केल्या जातात.
शाडूमातीपासून तयार करण्यात आलेल्या अत्यंत देखण्या आणि सूबक गणेशमूर्ती प्रसादे यांच्या गणेश चित्र शाळेत पहायला मिळतात. विठोबा प्रसादे यांनी ही गणेश चित्र शाळा सुरु केली. पहिल्यांदा काही मोजक्याच गणपती साकारून ही गणेश चित्र शाळा सुरु झाली. मात्र, त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी हा गणपती साकारण्याचा डोलारा सांभाळला आहे.
विश्वास प्रसादे आणि अशोक प्रसादे ही इथे गणेश मूर्ती साकारणारी तिसरी पिढी आहेत. वयाची पासष्टी पार करूनही ते गणेश मूर्ती साकारण्यात रमतात. तर त्यांची नात स्वरा प्रसादे ही या कारखान्यात सर्वात तरुण कलाकार आहे. पाचव्या पिढीची स्वरा बायोटेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षाला आहे. अभ्यासातून वेळ काढून ती मूर्ती साकारण्याचा छंद जोपासते. प्रसादे कुटुंबाची पाचवी पिढी ही उच्चशिक्षित असूनही अगदी न कंटाळता या कामात रममाण झालेली पहायला मिळते.