रत्नागिरी- मुसळधार पावसाचा फटका गणपतीपुळे देवस्थानला बसला आहे. त्यामुळे भाविकांची मात्र गैरसोय होणार आहे. पावसामुळे प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी कोसळली आहे. त्यामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष डॉ विवेक भिडे यांनी दिली आहे.
गणपतीपुळेत येणाऱ्या भाविकांची होणार गैरसोय; प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस राहणार बंद - गणपतीपुळे
पावसामुळे प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी कोसळली आहे. त्यामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष डॉ विवेक भिडे यांनी दिली आहे.
गणपतीपुळे
अतिवृष्टीमुळे गणपतीपुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणची संरक्षक भिंत तसेच तलावाची भिंत कोसळली आहे. त्यामुळे देवस्थानचे जवळपास 15 ते 20 लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या पाऊस असल्याने डागडुजी करणे शक्य नाही, पाऊस कमी झाल्यानंतर ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणची डागडुजी करण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस बंद राहणार असल्याची प्रतिक्रिया देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी दिली आहे.