रत्नागिरी- सध्या कोरोना विरोधातील लढ्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या पोमेंडी खुर्दमधील शेतकरी आणि ग्रामस्थांनी या लढ्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जवळपास 32 हजार 541 रुपयांची मदत या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी गोळा करून ही मदत प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे.
रत्नागिरी : पोमेंडीतील शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत
रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या पोमेंडी खुर्दमधील शेतकरी आणि ग्रामस्थांनी 32 हजार 541 रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी केली आहे.
पोमेंडी खुर्द गावात जवळपास 90 टक्के लोक हे शेतकरी कुटूंबातील आहेत. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कोरोना विरोधातील या लढाईत राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला या गावातील ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला. गावातील ज्याला जमेल तसा निधी गोळा केला. जवळपास 32 हजार 541 रुपये जमा करण्यात आले. या रकमेचा डीडी प्रशासनाकडे सुपूर्द केला.
हेही वाचा -रत्नागिरीत कोरोना फिडबॅक कक्ष स्थापन, प्रत्येक गावातून घेतला जातो आढावा