रत्नागिरी -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण 57 ठिकाणी नाकांबदी करण्यात आली आहे. 15 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत 40 हजार 850 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी
संचारबंदीची कडक अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान, 15 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत नाकांबदीच्या ठिकाणी एकूण वाहने 29 हजार 349 एवढी वाहने तपासली. तसेच नाकाबंदीच्या काळात वाहनामधील 51 हजार 892 एवढ्या लोकांची तपासणी केली. मोटार वाहन कायदा अंतर्गत एकूण 40 हजार 850 एवढे खटले दाखल केल्या व त्यातून 1 कोटी 6 लाख 10 हजार 700 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.