महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाकरमान्यांना रत्नागिरीत सोडून परतणाऱ्या वाहनांवर खेड पोलिसांची कारवाई - गोळीबार मैदान

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येऊ लागले. लॉकडाऊननंतर सुनसान झालेल्या मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांना घेऊन येणारी हजारो वाहने धावू लागली. मात्र सकाळपासून खेड पोलिसांनी सुमारे दीडशेहून अधिक वाहनांवर कारवाई करून ती सर्व वाहने खेड शहरातील गोळीबार मैदानावर पार्क करुन ठेवली आहेत. त्यामुळे या वाहनांचे चालक आणि क्लिनर हे देखील खेडमध्ये अडकून पडले आहेत.

gadi
वाहनांवर खेड पोलिसांची कारवाई

By

Published : May 18, 2020, 6:19 PM IST

रत्नागिरी- मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात सोडून परतणाऱ्या वाहनांना खेड पोलिसांनी कशेडी घाटात रोखून कारवाई केली. या कारवाईत सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली असून ती खेड शहरातील गोळीबार मैदानावर पार्क करुन ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये अडकून पडलेल्या चाकरमान्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येऊ लागले. लॉकडाऊननंतर सुनसान झालेल्या मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांना घेऊन येणारी हजारो वाहने धावू लागली. रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली. गेल्या काही दिवसात तर कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढून ९२ वर पोहोचली. त्यामुळे जिल्हा प्रशासनावरील ताण कमालीचा वाढला. चाकरमान्यांना रत्नागिरी जिल्ह्यात सोडून मुंबईत परत जाणारी वाहने पुन्हा चाकरमान्यांना घेऊन कोकणात येत होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या आणि त्याचबरोबर कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली होती.

चाकरमान्यांना रत्नागिरीत सोडून परतणाऱ्या वाहनांवर खेड पोलिसांची कारवाई

जिल्ह्यात वेगाने फैलावणाऱ्या कोरोनाला प्रतिबंध करायचे असेल, तर मुंबई, पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्यांना रोखण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बहुधा चाकरमान्यांना सोडून परतीच्या मार्गावरील वाहने ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केल्याचे बोलले जात आहे. सकाळपासून खेड पोलिसांनी सुमारे दीडशेहून अधिक वाहनांवर कारवाई करून ती सर्व वाहने खेड शहरातील गोळीबार मैदानावर पार्क करुन ठेवली आहेत. त्यामुळे या वाहनांचे चालक आणि क्लिनर हे देखील खेडमध्ये अडकून पडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही वाहने गोळीबार मैदान येथेच पार्क करून ठेवली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने आणि त्यांची हिस्ट्री ही मुंबई प्रवासाची असल्याने मुंबई व पुणे येथील चाकरमान्यांना रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी जास्त पास देवू नये, अशी विनंती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडून सरकारला करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचे कारण हे मुंबई येथून येणारे चाकरमानीच आहेत हे स्पष्ट झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details