रत्नागिरी - गेले दोन महिने राज्याची कोरोनाशी लढाई सुरू आहे. पोलीस या लढ्यात आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. विशेषतः, कंटेन्मेंट झोनमध्ये काम करताना पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. अशा ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी राबविला आहे. डॉ. मुंढे यांच्या संकल्पनेतून पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो असलेल्या प्रशस्तीपत्रकाची फ्रेम देऊन त्यांचा गौरव करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली.
कोरोनायोद्ध्या पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची अनोखी थाप - police on corona duty
आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढेंनी राबविला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो असलेल्या प्रशस्तीपत्रकाची फ्रेम देऊन त्यांचा गौरव केला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन पोलिसांना देण्यात आले.
राज्यात प्रथमच रत्नागिरीत हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन पोलिसांना देण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक आयुब खान, पोलीस निरीक्षक शिरीष सासने, अनिल लाड आदी अधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये लढवय्या पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वात पुढे उभा आहे. या लढाईत त्याचे खच्चीकरण होऊ नये, नव्या उमेदीने पुन्हा आपले कर्तव्य बजावावे, त्यांचे मनोधैर्य वाढावे यासाठी जिल्हा पोलीस दलाने हा अनोखा उपक्रम राबविला आहे. जिल्ह्यातील अशा 300 कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार असल्याचे, पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी सांगितले.