महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांची समुद्रात गस्त - ratnagiri live

तोक्ते चक्रीवादळ हे १५ आणि १६ मे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचा किनापट्टीवरुन पुढे सरकण्याची शक्यता आहे. यापार्श्वभुमीवर शुक्रवारी सकाळपासून पोलीस खात्याने किनारी भागात गस्त ठेवली आहे. पोलिसांनी स्पीड बोटीव्दारे समुद्रात जाऊन सावधानतेच्या सूचना दिल्या. यावेळी मिरकरवाडा, जयगड अशा ठिकाणी जाऊन पोलिसांनी मच्छीमारांना सूचना दिल्या.

ratnagiri hurricane live update
रत्नागिरी पोलिसांची समुद्रात गस्त

By

Published : May 15, 2021, 10:06 AM IST

रत्नागिरी - अरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ हे १५ आणि १६ मे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचा किनापट्टीवरुन पुढे सरकण्याची शक्यता आहे. यापार्श्वभुमीवर शुक्रवारी सकाळपासून पोलीस खात्याने किनारी भागात गस्त ठेवली आहे. तसेच किनारी भागात किंवा समुद्रात असणार्‍या बोटींना पोलीस दलाने चक्रीवादळाचा पार्श्वभूमीवर किनार्‍यालगत येऊन थांबण्याचा सूचना दिल्या.

रत्नागिरी पोलिसांची समुद्रात गस्त

स्पीड बोटीव्दारे समुद्रात जाऊन सावधानतेच्या सूचना -

पोलिसांनी स्पीड बोटीव्दारे समुद्रात जाऊन सावधानतेच्या सूचना दिल्या. यावेळी मिरकरवाडा, जयगड अशा ठिकाणी जाऊन पोलिसांनी मच्छीमारांना सूचना दिल्या. यावेळी गस्तीनौकेवरती पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत, पोलीस उपनिरीक्षक संदिप वांगणेकर, रमेश दळवी पोलीस नाईक राहुल गायकवाड, पोलीस काॅन्सटेबल सचिन सुर्वे व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - मुंबई : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

ABOUT THE AUTHOR

...view details