रत्नागिरी - सातत्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या विळख्यात आता पोलीस कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सध्या कारागृहामध्ये 136 कैदी आहेत. या सर्वांचे स्वॅब घेतले जाणार आहेत, तर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे.
रत्नागिरी कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण - ratnagiri jail covid 19 condition
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दररोज कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, रत्नागिरी विशेष कारागृहातील एका 29 वर्षाच्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दररोज कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, रत्नागिरी विशेष कारागृहातील एका 29 वर्षाच्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. हा कर्मचारी आजारी असल्याने चार दिवसांपासून सुट्टीवर होता. मात्र, मंगळवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कारागृहातील कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील एक नर्स देखील कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आली आहे. साखरतर हे गाव कण्टेटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या कण्टेटमेंट झोनमध्ये सेवा बजावणाऱ्या आशा सेविकेला देखील कोरोनाची लागण झाली आहे.