रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन पोलीस करत आहेत. मात्र, काही व्यक्तींना याची गंभीरता नसल्याने ते बाहेर पडून प्रशासनाच्या अडचणी वाढवत आहेत. त्यामुळे क्षुल्लक कारणांसाठी गाड्या घेऊन बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलायं. अनोख्या पद्धतीने पोलिसांनी या बाहेर फिरणाऱ्यांना शिक्षा केली आहे. शहरातील मारूती मंदिर चौकात नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्ती सापडल्यानंतर त्यांना जवळपास तीन तास बसवून ठेवण्यात येत आहे. यावेळी त्यांना 'कायदा पाळा आणि कोरोनाला पळवा' असे आवाहन देखील करण्यात आले.
विनाकारण फिरणार?...मग बसवूनच ठेवणार!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. तसेच विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन पोलीस करत आहेत. मात्र काही व्यक्तींना याची गंभीरता नसल्याने ते बाहेर पडून प्रशासनाच्या अडचणी वाढवत आहेत.
चौकशी केल्यानंतरच अशा महाभागांना चौकात बसवून ठेवले जात आहे. नागरिकांनी सहकार्य न केल्यास आणखी कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस देत आहेत. गुरुवारी संध्याकाळी देखील आशा विनाकारण फिरणाऱ्यांना मारूती मंदिराजवळील स्टेडियमवर अशाच प्रकारे बसवण्यात आलं होतं. यावेळी त्यांचे प्रबोधन करण्यात आले. घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तींना धडा शिकवण्यासाठी पोलीस वेगवेगळे फंडे वापरत आहेत. काही ठिकाणी लोकांना योगासने करण्याची शिक्षा देण्यात येत आहे. तर काही ठिकाणी अशा व्यक्तींची आरती करून त्यांना पुष्पहार घालण्यात येत आहेत.