महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महागाईचा फटका : पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 3 रुपयांनी वाढणार ? - पेट्रोल

महागाईचा फटका : पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 3 रुपयांनी वाढणार ?

By

Published : Jul 6, 2019, 1:27 PM IST

Updated : Jul 6, 2019, 2:56 PM IST

2019-07-06 13:14:02

पेट्रोलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 7 वरून 10 रुपयांवर प्रस्तावित करण्यात आली आहे. तर डिझेलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 1 रुपयांवरून 4 करण्याची प्रस्तावित केली आहे.

महागाईचा फटका : पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 3 रुपयांनी वाढणार ?

रत्नागिरी - शुक्रवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर 1 रुपयांचा कर वाढल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मध्यरात्री  पेट्रोल-डिझेल दरात अडीच रुपयांपर्यंत वाढ झालेली दिसत आहे. तरीही पेट्रोल-डिझेल आणखी 3 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. 

पेट्रोलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 7 वरून 10 रुपयांवर प्रस्तावित करण्यात आली आहे. तर डिझेलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 1 रुपयांवरून 4 करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. त्यामुळे स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटीमध्ये प्रत्येकी 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच रोड अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सेझ पेट्रोल आणि डिझेल कर 8 वरून 10 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे रोड सेझमध्ये देखील 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजे एकूण ही 5 रुपयांची वाढ आहे. त्यापैकी 2 रुपयांची वाढ रात्री करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर 25 टक्के व्हॅट लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर आज सव्वा दोन ते अडीच रुपयांनी वाढले आहेत. मात्र, येत्या काही दिवसात सरकारने ठरवल्यास पेट्रोल-डिझेल आणखी 3 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. 

Last Updated : Jul 6, 2019, 2:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details