महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राजकीय नेत्यांनी आम्हाला संपवण्याचा विडाच उचलला आहे' - रत्नागिरी पर्सेसीन मच्छिमार

पर्सेसीन धारकरांवर पारंपरिक मच्छिमार दबाव टाकून कारवाई करायला भाग पाडत असल्याचा आरोप पर्सेसीन मच्छिमारांनी केला आहे.

मच्छिमार बैठक
मच्छिमार बैठक

By

Published : Apr 2, 2021, 10:48 PM IST

Updated : Apr 3, 2021, 12:39 PM IST

रत्नागिरी -जिल्ह्यातील पारंपरिक विरुद्ध पर्सेसीन मच्छिमारांमधील वाद पुन्हा उफाळला आहे. पारंपरिक मच्छिमारांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा रत्नागिरी जिल्ह्यातील पर्सेसीन मच्छिमार संघटनेने दिला आहे. कायद्याने आम्हाला समुद्रात १२ नाॅटिकल मेलाच्या बाहेर मच्छिमारी करण्याची परवानगी आहे. मात्र, पर्सेसीन धारकरांवर पारंपरिक मच्छिमार दबाव टाकून कारवाई करायला भाग पाडत असल्याचा आरोप पर्सेसीन मच्छिमारांनी केला आहे. पर्सेसीन मच्छिमारांवर अन्याय झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा मच्छिमार नेते नासीर वाघू यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

मच्छिमार नेते
'पर्सेसीन मच्छिमारांचा व्यवसाय बुडवण्याचा डाव' जिल्ह्यात पारंपरिक विरूद्ध पर्सेसीन असा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. या वादात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून गुरूवारी पर्सेसीन नेटधारक मच्छिमारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना मच्छिमार नेते नासिर वाघू म्हणाले, की पारंपरिक मच्छिमारांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून पर्सेसीन मच्छिमारांचा व्यवसाय बुडवण्याचा डाव आखला आहे. आम्हाला संपविण्याचा डाव राजकीय नेत्यांनी आखला आहे.


'ते आंदोलन म्हणजे नौटंकी'
हर्णै येथील मच्छिमारांचे आंदोलन म्हणजे नौटंकी होती. चार महिने गुजरात, गोवा, कर्नाटक येथील नौका एलईडी मासेमारी करीत होत्या. त्यावेळी आंदोलनकर्ते झोपले होते का? असा सवाल उपस्थित करत शिमगा जवळ आला की त्यांना रत्नागिरी बंदर दिसते, असा आरोपही वाघू यांनी यावेळी केला आहे.

'चुकीच्या पद्धतीने कारवाई'
प्रत्येकवेळी पर्सेसीनवर निर्बंध घातले जातात. १२ नॉटिकल बाहेर मासेमारी करण्याची परवानगी या काळात असताना देखील मासेमारी नियमांची अपुरी माहिती असलेल्या अधिकार्‍यांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचा-राज्यात टाळेबंदी लावणार नाही, निर्बंध आणखी कडक केले जातील - वडेट्टीवार

Last Updated : Apr 3, 2021, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details