महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे देशाच्या सुरक्षेच्या विरोधात, रत्नागिरीत सरकारविरोधी निदर्शने - त्नागिरीत सरकारविरोधी निदर्शने

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामधून (सीएबी)  मुस्लीम समाजाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात प्रचंड आक्रोश असल्याचे पाहायला मिळत आहे. याच विधेयकाच्या विरोधात  जमीअत उलमा हिंद रत्नागिरीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

ratnagiri
रत्नागिरीत सरकारविरोधी निदर्शने

By

Published : Dec 14, 2019, 8:20 AM IST


रत्नागिरी - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामधून (सीएबी) मुस्लीम समाजाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात प्रचंड आक्रोश असल्याचे पाहायला मिळत आहे. याच विधेयकाच्या विरोधात जमीअत उलमा हिंद रत्नागिरीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

रत्नागिरीत सरकारविरोधी निदर्शने

भाजपने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभेतही मंजूर करुन घेतले. त्यामुळे मुस्लीम समाजामध्ये नाराजीची भावना आहे. बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशात झालेल्या त्रासामुळे ज्या हिंदू, बौध्द, जैन, शीख, फारशी व ख्रिश्‍चन लोकांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यांना देशाचे नागरिकत्व देण्याची तरतुद या सुधारणा विधेयकात आहे. मात्र, मुस्लीमांना यातून वगळण्यात आल्याचा आक्षेप घेतला जात आहे. त्याचप्रमाणे या विधेयकामुळे कलम 14 तसेच इतर कलमांचे उल्‍लंघन होत असल्याचे मत निदर्शनामध्ये सहभागी झालेल्या मुस्लीम बांधवांनी व्यक्‍त केले. हे विधेयक देशाच्या सुरक्षेच्या विरोधात असून यामुळे कोणीही देशात घुसू शकतो अशा भावना व्यक्‍त केल्या जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details