रत्नागिरी - बाप्पाच्या विसर्जनासोबत कोविडचेही विसर्जन होऊ दे, असे साकडे कोकणात येणारे चाकरमानी गणरायाला घालताना दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दाखल होत आहेत. मात्र यंदाच्या या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने चाकरमान्यांनाही अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गणरायाच्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होऊ दे असे साकडे चाकरमानी गणरायाला घालत आहेत.
बाप्पाच्या विसर्जनासोबत कोविडचेही विसर्जन होऊ दे; चाकरमान्यांचे गणरायाला साकडे - रत्नागिरी कोरोना बातमी
चाकरमान्यांच्या गाड्यांची वर्दळ मात्र महामार्गावर दिसून येत होती. चाकरमानी सर्व तयारीनिशी गावाकडे दाखल होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, रत्नागिरीच्या हातखंबा चेकपोस्टवरून कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांशी संवाद साधलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन सक्तीचा आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी गावी यायचे असेल तर 7 तारखेपर्यंत या आणि क्वारंटाईन व्हा, अशा सूचना ग्रामपंचायतींकडून चाकरमान्यांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 15 ते 20 दिवस अगोदर चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत.
शनिवार आणि रविवारी कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या तुलनेत आज (सोमवार) मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा ओघ थोडा कमी होता. पण चाकरमान्यांच्या गाड्यांची वर्दळ मात्र महामार्गावर दिसून येत होती. चाकरमानी सर्व तयारीनिशी गावाकडे दाखल होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, रत्नागिरीच्या हातखंबा चेकपोस्टवरून कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांशी संवाद साधलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.