रत्नागिरी -जिल्ह्यात संचारबंदीची कडक अमंलबजावणी करण्यात येत आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनीही नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, रस्त्यांवर गाड्या घेऊन येणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच, विनाकारण बाहेर येणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे.
वाहन चालकांची चौकशी करताना पोलीस हेही वाचा -विक-एन्ड लॉकडाऊनमुळे एसटी विभागाचा मोठा तोटा
संचारबंदीला चांगला प्रतिसाद
संचारबंदीला रत्नागिरीकर चांगला प्रतिसाद देत असल्याचे पहायला मिळाले. काही अपवाद वगळता अत्यावश्यक कारणाशिवाय कोणी घराबाहेर पडताना दिसत नाही. त्यामुळे, रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाकी सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, अत्यावश्यक दुकानांमध्ये तुरळक गर्दी पाहायला मिळाली. संचारबंदीला नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा -केंद्र सरकारच्या निषेधासाठी काँग्रेसचं ‘घंटा अन् थाळी नाद' आंदोलन