गांग्रई खाडी भागात अवैधरित्या बेसुमार वाळू उत्खनन; प्रशासनाची डोळेझाक? - ग्रांगई खाडी वाळू उपसा
चिपळूण तालुक्यात अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू आहेत. या विरोधात नागरिकाकडून वारंवार तक्रारी करण्यात आहेत. तरही महसूल प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. शासनाचा महसूल बुडवून गेल्या अनेक महिन्यांपासून वाळू तस्करी केली जात आहे.
रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या चिपळूण येथील एकाच ठेकेदारास वाळू उत्खननाचा परवाना मिळाला आहे. मात्र, बाकी ठिकाणच्या काही नदीपात्रांमध्ये परवानगी नसतानाही अनधिकृतपणे वाळू उत्खनन सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील गांग्रई खाडी भागातही अशाच प्रकारे अनधिकृतपणे बेसुमार वाळू उत्खनन सुरू आहे. हातपाटीद्वारे हे वाळू उत्खनन सुरू आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून अनधिकृतपणे सुरू असलेल्या या वाळू उत्खननाकडे स्थानिक महसूल प्रशासन मात्र कारवाई न करता सोयिस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.