महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समाधानकारक पावसामुळे भातलावणीच्या कामांना वेग, चाकरमानीही भातशेतीत व्यस्त - रत्नागिरी शेतीविषयक बातमी

जिल्ह्यात मुख्यतः भाताचे पीक घेतले जाते. पण कोकणातील ही भाताची शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. त्यामुळे कोकणातील शेतकरी नेहमीच पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे वेळेत झाली.

ratnagiri rice planting  ratnagiri rain news  ratnagiri farming news  रत्नागिरी लेटेस्ट न्यूज  रत्नागिरी शेतीविषयक बातमी  रत्नागिरी भातलावणी बातमी
समाधानकारक पावसामुळे भातलावणीच्या कामांना वेग, चाकरमानीही भातशेतीत व्यस्त

By

Published : Jul 6, 2020, 12:54 PM IST

रत्नागिरी - गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाअभावी शेतीची कामे खोळंबली होती. मात्र, दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने भातलावणीचे कामे सुरू झाली आहेत.

जिल्ह्यात मुख्यतः भाताचे पीक घेतले जाते. पण कोकणातील ही भाताची शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. त्यामुळे कोकणातील शेतकरी नेहमीच पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे वेळेत झाली. त्यानंतरही पावसाने साथ दिल्याने शेतीची इतर कामं शेतकऱ्याला करता आली. मात्र, मध्येच आठ दिवस पाऊस गायब झाला. गेले पाच ते सहा दिवस पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून आता भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात जवळपास 70 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते.

समाधानकारक पावसामुळे भातलावणीच्या कामांना वेग, चाकरमानीही भातशेतीत व्यस्त

दरम्यान, सध्या कोरोनामुळे मुंबई पुण्यातून अनेक चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. हे चाकरमानी सुद्धा भात लागवडीच्या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे, तर अगदी लहान मुलं देखील या भात लागवडीची मजा घेताना दिसत आहेत, तर पारंपरिक गाणी अर्थात भलरी सुद्धा भात लागवड करताना म्हटली जात आहेत. या भलरीमुळे काम करण्यास उत्साह येतो. दरम्यान, पारंपरिकतेबरोबरच सध्या यांत्रिकीकरणाकडे कोकणातील शेतकरी वळताना दिसतोय. त्यामुळे छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात नांगरणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details