महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच; भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात - रत्नागिरी पाऊस न्यूज

आज सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 67.11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात झाला असून, त्याठिकाणी 87 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार सुरू असल्याने बळीराजाही सुखावला असून, भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

Rain
पाऊस

By

Published : Jul 9, 2020, 3:35 PM IST

रत्नागिरी -आज सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 67.11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात झाला असून, त्याठिकाणी 87 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल लांजा तालुक्यात 77 मिमी, मंडणगड तालुक्यात 76 मिमी आणि दापोली तालुक्यात 73 मिमी, चिपळूणमध्ये 69 मिमी, खेडमध्ये 67 मिमी, रत्नागिरी 58 मिमी, संगमेश्वर 56 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नद्या आणि धरणांच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

संततधार सुरू असल्याने बळीराजाही सुखावला असून, भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पुढचे काही दिवस पाऊस असाच बरसत राहावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. जिल्ह्यात मुख्यतः भाताचे पीक घेतले जाते. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे वेळेत झाली. त्यानंतरही पावसाने साथ दिल्याने शेतीची इतर कामे शेतकऱ्याला करता आली. मात्र, मध्येच आठ दिवस पाऊस गायब झाला. गेले पाच ते सहा दिवस पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात जवळपास 70 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details