रत्नागिरी- गेले काही दिवस मोठ्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. यातले काही चाकरमानी आपल्या गाड्या घेऊन बाजारांत फिरत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. त्यामुळे गावात आलेल्या चाकरमान्यांनी आपल्या गाड्यांच्या चाव्या ग्राम कृती दलाकडे जमा कराव्यात, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिल्या आहेत. अध्यक्षांच्या या सुचनेमुळे विनाकारण फिरणाऱ्या चाकरमान्यांना वचक बसणार आहे.
बाहेरून आलेल्या चाकरमान्यांना गाड्यांच्या चाव्या ग्रामकृती दलाकडे जमा करण्याच्या सूचना - rohan bane ratnagiri
मुंबई, ठाणे तसेच पुण्यात मोठ्या संख्येने रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे या भागातून सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. अनेक चाकरमानी आपली स्वतःची वाहने घेऊन जिल्ह्यात दाखल होत आहेत.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. त्यातही मुंबई, ठाणे तसेच पुण्यातही मोठ्या संख्येने रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे या भागातून सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. अनेक चाकरमानी आपली स्वतः ची वाहने घेऊन जिल्ह्यात दाखल होत आहेत. अशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्केही मारले जात आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील काही चाकरमानी घरात न बसता बाजारात गर्दी करताना दिसतात. अशा लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. मुंबईकर चाकरमान्यांनी कोकणात यावे, त्यांचे स्वागतच आहे. मात्र, त्यांनी कोरोना संदर्भातील नियम पाळावेत. 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावे. मात्र या नियमांचाच एक भाग म्हणून चाकरमान्यांनी आपल्या गाड्यांच्या चाव्या ग्रामकृती दलाकडे जमा कराव्यात, अशा सूचना रोहन बने यांनी दिल्या आहेत.