रत्नागिरी - मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात विरोधकांनी जी काही मुक्ताफळे उधळली, ती अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांना फटकारले. ते आज रत्नागिरी जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवले
यावेळी तटकरे म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळावेळी निकषांच्या पलीकडे जाऊन कोकणवासीयांना मदत करण्याचा प्रयत्न केला. या वेळी देखील राज्य सरकारने कोकणाला झुकते माप देत सहकार्याने मदत करावी, अशी ठाम भूमिका माझी राहणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
विरोधकांवर टीका
तटकरे म्हणाले की, संकटाच्या काळात सर्व एक होत असतात, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. संकटाचा मुकाबला सामुदायिकरित्या करायचा असतो, राजकारण करायचे, त्यावेळी करता येईल. माननीय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या संदर्भात जी काही मुक्ताफळे उधळली गेली, ती अत्यंत दुर्दैवी आहेत. यापेक्षा अधिक मी काही बोलू इच्छित नाही. या संकटाच्या काळात टीका टिप्पणी करण्यापेक्षा कोकणवासीयांच्या पदरी काय अधिक पडेल, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.