रत्नागिरी -पुणे-मुंबई हायपर लूपचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले नसल्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ज्या योजनांवर अतिरिक्त खर्च दिसत आहे, त्याचा आढावा घेऊन पुढे जाण्यासाठी काही कामे थांबवलेली आहेत. त्यामध्येच पुणे-मुंबई हायपर लूप असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. मात्र, ठाकरे सरकार फडणवीस सरकारचे सगळे प्रकल्प गुंडाळणार, अशी महाविकास आघाडीची चुकीची प्रतिमा विरोधकांकडून निर्माण केली जात असल्याचेही सामंत म्हणाले.
आम्ही समृद्धी महामार्ग पूर्ण ताकदीने पुढे नेण्याचे काम करत आहोत. त्यामुळे असे प्रकल्प बंद करण्याचा विषयच येत नसल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ते आज (शनिवार) येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.