महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dhopeshwar Refinery Project : राजपूर रिफायनरीविरोधात विरोधक आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीची वेळ

राजापूरातील धोपेश्वर रिफायनरीचा ( Dhopeshwar Refinery Project ) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रिफायनरी विरोधी संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ( CM Uddhav Thackeray ) लिहले आहे.

Dhopeshwar Refinery Project
Dhopeshwar Refinery Project

By

Published : Apr 14, 2022, 4:27 PM IST

रत्नागिरी -राजापूरातील धोपेश्वर रिफायनरीचा ( Dhopeshwar Refinery Project ) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे समर्थक आपल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करत आहेत. तर, दुसरीकडे आता रिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. रिफायनरी विरोधी संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले ( CM Uddhav Thackeray ) आहे. पत्रातून रिफायनरी विरोधकांची बाजू मांडण्यासाठी तातडीची वेळ मागीतली आहे. तसेच, रिफायनरीसाठी बारसू-सोलगावची जागा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहलेल्या पत्राबद्दल नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे. मध्यस्थिला कुणीही नको, थेट भेट हवी, अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राजपूर रिफानरीविरोधात विरोधकांचा मोर्चा

पत्रात काय म्हटले आहे? -मा. मुख्ममंत्री उद्धव ठाकरे, आपण नाणार परिसरातील जनतेच्या विरोधाची दखल घेऊन विनाशकारी रिफायनरी रद्द केली. कोकणाची राखरांगोळी आणि कोकणाचे गॅस चेंबर होऊ देणार नाही, याची ग्वाहीही दिली होती. मात्र, असे असतानाही १२ जानेवारी २०२२ रोजी आपण केंद्र सरकारला बारसु-गोवळ-धोपेश्वर-नाटे-राजवाडी येथील जमीन रिफायनरी व क्रूड ऑइल टर्मिनलसाठी उपलब्ध करून देतो, अशा आशयाचे पत्र लिहिल्याचे माध्यमांमधून कळले. यामुळे आपली जी लोकाभिमुख नायकाची प्रतिमा आमच्या मनात होती, त्याला तडा गेला. आमच्या परिसरात बारसु-सोलगाव धोपेश्वर येथे प्रस्तावित करण्याबाबत वक्तव्य खासदार व पक्षाचे सचिव विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडून होत आहे. तसेच, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून विशेष प्रयत्नशील आहेत, असे समजते.

विरोधी संघटनेचे मुख्यमंत्री ठाकरेंना लिहलेले पत्र

लोकांचा विरोध असेल तर रिफायनरी लादणार नाही, अशीच महाविकास आघाडी व शिवसेना पक्षाचीही भूमिका आहे, असे आम्ही मानतो. देवाचे गोठणे, शिवणे खु., सोलगाव, गोवळ, धोपेश्वर आणि आंबोळगाड या गावांचे रिफायनरी विरोधाचे ग्रामसभाचे ठराव झालेले आहेत ( मासिक सभांचे नव्हे ). आपल्याकडे द्यावयास ५००० ग्रामस्थांचे रिफायनरी विरोधात सह्यांचे निवेदन आम्ही खासदार विनायक राऊत यांचेकडे दिले होते. ८ मार्च २०२२ रोजी आझाद मैदानावर २००० ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले. तेव्हाही आपणाला भेटण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. परंतू, भेट सोडा कुठला निरोपही नाही आला. आमच्या प्रामाणिक आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले. ५००० हुन अधिक स्थानिक ग्रामस्थांनी ३० मार्च २०२२ रोजी तहसील कार्यालयावर रिफायनरी विरोधात मोर्चा काढला होता. आपल्यापर्यंत स्थानिकांची विरोधाची भूमिका पोहचली आहेच. प्रत्यक्ष भेटून ती सविस्तरपणे आपल्यासमोर मांडण्यासाठी आम्हा स्थानिक ग्रामस्थानां वेळ द्यावी, अशी विनंती आम्ही करत आहोत. भेटेची वेळ लवकरच मिळेल ही अपेक्षा, असे पत्र रिफायनरी विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहले आहे.

हेही वाचा -Load Shedding Crisis :वीज संकट - उर्जामंत्र्यांचे केंद्रावर खापर, माजी उर्जामंत्री म्हणतात नाचाता येईना अंगण...

ABOUT THE AUTHOR

...view details