महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ratnagiri Car Accident : रत्नागिरीत साखरपुड्याला जाणाऱ्या कारला अपघात, 1 जण ठार, 6 जण जखमी

साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या कारचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मार्गावर अपघात ( Accident On Dapoli Khed Road ) झाला. या घटनेत १ जण ठार झाला असून, ६ जण जखमी झाले ( One Death Six Injured In Accident ) आहेत.

By

Published : Apr 22, 2022, 10:43 PM IST

Accident On Dapoli Khed Road
रत्नागिरीत दापोली खेड मार्गावर अपघात

रत्नागिरी : साखरपुड्याला जाणाऱ्या कारला झालेल्या अपघातात एक जण ठार तर, ६ जण जखमी ( One Death Six Injured In Accident ) झाल्याची घटना दापोली खेड मार्गावर कुंभवे येथे घडली ( Accident On Dapoli Khed Road ) आहे. जखमींवर दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभवे येथील तुषार बाळकृष्ण डिके यांचा साखरपुडा मंडणगड तालुक्यातील पालवणी येथे आज दुपारी १२ वाजता होता. यासाठी ३ गाड्या होत्या. एक बस या कार्यक्रमासाठी अगोदर पुढे गेली होती. सकाळी ९ च्या सुमारास तुषार हा त्याने मुंबई येथून मित्राची आणलेली आय १० गाडी घेऊन ६ जनांसह पालवणी येथे निघाला होता. त्यावेळी कुंभवे येथील प्राथमिक शाळेसमोरील गतिरोधकावर गाडी आदळून रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या मैलाच्या दगडावर आपटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात उलटली. या अपघातात गाडीतील सर्व जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडी ज्याचा आज साखरपुडा होता तो तुषार डिके चालवत होता. या अपघातात गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या दीपक सीताराम कदम (वय ५०) यांच्या डोक्याच्या मागील बाजूस दगड लागला व ते गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात देवेंद्र दीपक कदम (वय १७), सचिन शंकर मते (वय २९), सागर अंबाजी मानसे (वय २५), धीरज दीपक कदम (वय १८), तुषार बाळकृष्ण डिके (वय २६), किशोर किसन साळवी (वय २९) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात ( Dapoli Sub District Hospital ) उपचार सुरु आहेत. मृत पावलेल्या दीपक कदम यांचे दोन मुलगेही या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघाताची खबर किशोर साळवी यांनी दापोली पोलीस ठाण्यात ( Dapoli Police Station ) दिली असून, या अपघाताची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा : Bus Accident : लग्नासाठी गावी चाललेल्या खासगी बसला अपघात, 25 जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details